
स्वत:च्या क्षमतांविषयी सकारात्मक दृष्टिकोण बाळगणारी व्यक्ती कोणत्याही समस्येला आत्मविश्वासाने सामोरी जाऊ शकते. त्यातूनच त्या व्यक्तीच्या अंगी इतरांप्रति सामंजस्याची व समन्यायाची भावना रुजते. आणि सामंजस्य व समन्याय ही लोकशाहीला पूरक अशीच तत्वे होत. संगोपन-संस्कारांचा दुसरा मापदंड म्हणजे बालकास अवतीभोवतीच्या जगातील वैविध्याविषयी आदर बाळगायला शिकवणे, हा होय. आपल्या अवतीभोवती दगडांचे, मातीचे, डोंगरांचे, पर्वतांचे, वृक्षांचे, पशूंचे, पक्ष्यांचे, माणसांचे, भाषांचे, सभ्यतांचे, चालीरीतींचे, जातींचे, धर्मांचे, प्रांतांचे, राष्ट्रांचे असे विविध प्रकार आढळतात. त्या सर्वच जैव आणि अजैव गोष्टींना त्यांच्या वैविध्यांसह इथे भूतलावर ‘असण्याचा’ हक्क आहे, याचे भान या संस्कारांतून निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सभोवतालच्या वैविध्यपूर्ण परिसरांविषयीची आणि त्यांतील घटकांविषयीची आस्था संगोपनातून जोपासली गेली पाहिजे. तरच बालकाच्या मनांत त्या कोणत्याही घटकाविषयी भीती, असूया आणि द्वेष यांऐवजी उत्सुकता, संयम आणि सहिष्णुता या भावना रुजतील.
बळकट सार्वजनिक क्षेत्रासाठीच्या कर्जविषयक गरजांविषयी सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगण्याची गरज केंद्रीय वित्त आयोगाच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामध्ये सार्वजनिक उपक्रमांचे कर्ज, केंद्र आणि राज्य सरकारांची संभाव्य देणी यांचा समावेश, वित्तीय पारदर्शकता आर्थिक आणि मौद्रिक धोरणात योग्य समन्वय आदींचा समावेश असावा, अशी अपेक्षा या तज्ज्ञांनी व्यक्त केली. वित्त आयोगाचे सदस्य दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर असून मुंबईतील नामवंत अर्थतज्ज्ञांशी या सदस्यांनी केली.